
Gold Silver Price: सोन्याच्या भावाने इतिहास रचला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन शिखरावर पोहोचला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशननुसार काल 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 89,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 50 रुपयांनी वाढून 89,050 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले.