
जागतिक तणावामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली, पण सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली.
दिल्ली आणि मुंबईत सोनं 1 लाखाच्या वर; चांदी 1.15 लाख रुपये प्रति किलोच्या घरात.
वायदा बाजारात मात्र किंमतीत घसरण दिसून आली आहे.
Gold-Silver Price Today: जागतिक स्तरावरील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली असली, तरी सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंना मोठा आधार मिळताना दिसतोय. आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर तब्बल 1,750 रुपयांनी वाढून 99,515 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, चांदीचे दरही 2,000 रुपयांनी वाढून ते 111,504 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.