Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

Gold Price Prediction: गेल्या 10 वर्षांतील सोन्याच्या परताव्याच्या आधारावर आज केलेली ₹50 हजारांची गुंतवणूक 10 वर्षांनी किती होऊ शकते, याचा अंदाज घेता येतो. 2036 पर्यंत वेगवेगळ्या वार्षिक परताव्यानुसार ही रक्कम किती लाखांपर्यंत पोहोचू शकते, जाणून घ्या.
Gold Investment Return

What Will ₹50,000 of Gold Be Worth After 10 Years? Check the Calculation

eSakal

Updated on

Gold investment returns India: सध्या जगभरात मौल्यवान धातू आणि सेफ हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याने गेल्या महिन्याभरात पुन्हा आपली तेजी दाखविली आहे. यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष सोन्याच्या भावाकडे लागले आहे. यात ज्यांनी आधीच सोनं घेतलं आहे त्यांच्यासाठी ही वाढ फायदेशीर ठरत आहे, तर लग्न किंवा इतर कारणांसाठी सोने खरेदी करणाऱ्यांच्या खर्चात मात्र मोठी वाढ होताना दिसते. त्यामुळेच सध्या एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे तो म्हणजे आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी त्याची किंमत किती होऊ शकते?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com