
Gold Price Prediction: इस्रायल-इराण तणावादरम्यान सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर सोन्याचे भाव वाढून 1,01,540 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले. सोन्याने 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडल्यानंतर, आता प्रश्न असा आहे की पुढील 12 महिन्यांत सोन्याचे भाव 1.25 लाख किंवा त्याहून जास्त वाढू शकतात का?