
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल 2,100 रुपयांनी वाढून 1,03,670 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला.
रुपयातील विक्रमी घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे ही वाढ पाहायला मिळाली.
आठवडाभरात सोन्याच्या भावात 3,300 रुपयांची वाढ, तर चांदीचा दर 1,000 रुपयांनी घसरला.
Gold Rate Today 30 August 2025: देशात सोन्याच्या भावाने नवा विक्रम केला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 2,100 रुपयांनी वाढून 1,03,670 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला. यापूर्वीचा दर 1,01,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि बाजारात वाढलेली खरेदी यामुळे सोन्याच्या भावातही जोरदार वाढ झाली आहे.
सोन्यातील ही तेजी सलग पाचव्या दिवशी कायम राहिली. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 1,03,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याआधी हा दर 1,01,000 रुपये होता.