
भारताला इतर आशियाई देशांच्या तुलनेत अधिक टॅरिफ लावण्यात आल्याने भारताला नुकसान होत आहे.
रशियन तेल खरेदीसारखे निर्णयही अमेरिकेच्या नाराजीचे कारण ठरले असून भारतासमोर आता फायद्या-तोट्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
रघुराम राजन म्हणाले की, हा केवळ व्यापार नाही, तर दबाव टाकण्याचा मार्ग आहे
Former RBI Governor Raghuram Rajan: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला आहे, तो केवळ व्यापार धोरणापुरता मर्यादित नाही तर हा राजकीय आणि आर्थिक ताकद दाखवण्याचा भाग आहे.