Gold Rate Today : सोन्याची पुन्हा भरारी, चांदीच्या भावातही वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Record High : देशभरात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹१,३०,००० च्या वर गेले असून नवीन उच्चांक नोंदवला आहे. चांदीचे भाव प्रति किलो ₹१,८२,००० पर्यंत पोहोचले, पण नंतर ₹३,००० नी घसरले. २४ कॅरेट सोन्याचा IBJA दर ₹१,२६,७१४ प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे.
Gold Rate Today

Gold Rate Today

Sakal

Updated on

Summary

गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत.
२०२५ मध्येच सोन्याच्या भावात ५१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ग्राहकांना हॉलमार्क तपासूनच सोने खरेदी करण्याचा सल्ला BIS कडून देण्यात आला आहे.

देशभरात सोने आणि चांदीचे भाव वाढतच आहेत.सोन्याने पुन्हा एकदा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२६,७१४ रुपये झाला. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम १,७४,००० रुपये झाला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १,३१,८०० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले.चांदीचे भाव त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून ३,००० रुपयांनी घसरून प्रति किलोग्रॅम १,८२,००० रुपयांवर पोहोचले (सर्व करांसह). IBJA नुसार, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com