

Gold Silver Rate Today India
esakal
Gold Price in Delhi, Mumbai and Pune: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोन्याच्या दरातील घसरण सलग सहाव्या दिवशीही कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सुरुवातीच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याच्या फ्युचर्स दरात १.२६ टक्क्यांची घसरण झाली. सोन्याचा दर तब्बल १,९०८ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १,४९,८२१ रुपयांवर आला. मागील सत्रात हा दर १,५१,७२९ रुपये होता.