

Gold prices rise again across major Indian cities while silver rates decline; investors weigh buying options ahead of Tulsi Vivah season.
esakal
Summary
आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली असून चांदीचे दर मात्र घसरले आहेत.
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२३,४४० रुपये झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत १,१३,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
सोन्याच्या भावात मागील काही दिवसांपासून घसरण सुरु होती मात्र आज वाढ होताना दिसत आहे, मात्र चांदीचा भाव आणखी कमी झाला आहे. तुळशी विवाहाच्या आधी सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा ताजा भाव काय आहे हे एकदा जाणून घ्या, देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२३,४४० रुपयांवर पोहोचला. एक दिवस आधी, फेडरल रिझर्व्हने मंद गतीने केलेल्या व्याजदर कपातीमुळे आणि अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यानंतर डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या भावती घसरल्या होत्या. आता, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२३,४४० रुपयांवर आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ११३,१६० रुपयांवर आहे.