Gold Rate: चीनचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या भावात मोठी घसरण; नेमकं काय घडलं?

Gold Rate In India: सोन्या-चांदीचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या वाढीने नवा विक्रम निर्माण केला आहे. मात्र भारतात सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण होत आहे.
Gold Rate In India
Gold Rate In IndiaSakal

Gold Rate In India: सोन्या-चांदीचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या वाढीने नवा विक्रम निर्माण केला आहे. मात्र भारतात सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण होत आहे. दोन दिवसांत सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या घसरलेल्या किमतीच्या मागे चीनचा हात आहे. चीनच्या निर्णयामुळे नवी दिल्लीपासून न्यूयॉर्कपर्यंत सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे. प्रत्यक्षात 18 महिन्यांनंतर चीनने सोने खरेदीला ब्रेक लावला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतात सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदी हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे राहिले आहेत. जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीन सतत सोन्याचा साठा वाढवत आहे. त्यामुळे भारतासह जगभरात सोन्याचा भाव गगनाला भिडत आहे. पण अचानक चीनने असा निर्णय घेतला ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चीनने सोने खरेदीवर बंदी घातली आहे.

Gold Rate In India
NSE Warns Investors: डीपफेक व्हिडीओबाबत एनएसईने गुंतवणूकदारांना दिला इशारा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेतील नोकऱ्यांमध्ये वाढ, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि चीनकडून सोन्याची खरेदी थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. बेंचमार्क सोन्याच्या फ्युचर्स किमती 2.43 टक्क्यांनी घसरून 2,332.85 प्रति औंस डॉलर झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव 2 टक्क्यांहून अधिक घसरून 73,131 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

सोन्याच्या साठ्यामुळे किमती वाढल्या

गेल्या 18 महिन्यांपासून चीन सतत सोन्याची खरेदी करत होता. चीनच्या या निर्णयामुळे सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला होता. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्यामुळे किमतीत मोठी वाढ झाली होती. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ चीनच नाही तर जगभरातील केंद्रीय बँकांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली.

Gold Rate In India
Tax Devolution: मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सर्वाधिक पैसे यूपी-बिहारला; मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला कमी रक्कम!

जगभरातील बँका त्यांच्या सोन्याचा साठा वाढवण्यात व्यस्त होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही सोन्याचा साठा वाढवला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर दिसून आला आणि भारतातील सोन्याने 75 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. आता चीनने सोने खरेदी बंद केली आहे. मे महिन्यात चीनने 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक लावला, त्यानंतर सोन्याचा भाव 4,000 रुपयांनी खाली आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com