
Gold Price Today
Sakal
Gold Rate Today: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर देशभरात सोन्या–चांदीच्या भावात किंचित घसरण दिसून आली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आठवड्याच्या तुलनेत सोने सुमारे 5,780 रुपयांनी वाढले असले, तरी धनत्रयोदशीच्या दिवशी 2,400 रुपयांची घट झाली आणि भाव 1,32,400 रुपयांवर आला होता. गेल्या एका वर्षात सोन्याच्या भावात तब्बल 51,000 रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच सुमारे 62.65 टक्क्यांची वाढ झाली आहे.