
आज भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या भावांनी उच्चांक गाठला.
एमसीएक्सवर सोने प्रतितोळा ₹1.05 लाखांवर पोहोचले, तर चांदीनेही ₹1.24 लाखांचा उच्चांक गाठला.
डॉलरमधील घसरण, फेडची व्याजदर कपातीची शक्यता आणि वाढती मागणी यामुळे भावात जोरदार वाढ झाली.
Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवार, 1 सप्टेंबर) शेअर बाजारासोबतच देशांतर्गत वायदा बाजारातही तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली.