
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतींनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव चांगलेच वाढले. दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढून प्रति 10 ग्रॅम ₹1,25,560 झाला आहे, तर 13 ऑक्टोबर रोजी भावात तब्बल ₹1,950 ने वाढ होऊन तो ₹1,27,950 च्या नव्या उच्चांकावर पोहोचला होता. देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारे दर वाढले असून गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली आहे.