
Himanshu Pandya warn about the gold rally
Sakal
Gold Prices Hit Record High: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ज्यांनी आधी गुंतवणूक केली, ते आता खूश आहेत; पण ज्यांनी गुंतवणूक केली नाही, त्यांना आता पश्चात्ताप होतोय. 2025 मध्येच सोनं तब्बल 60 टक्क्यांनी महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस डॉलर 4000च्या वर गेला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोनं महाग होणं हे शुभ संकेत नसून, धोक्याचा इशारा आहे.