
Gold Rate Today: सोन्याने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यापासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी सोन्याने 1,00,000 रुपयांची पातळी गाठली होती परंतु त्यानंतर सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे.
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 90,000 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 98,200 रुपये आहे. चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या वर आहे.