Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता; गेल्या 9 दिवसांत झाली एवढी वाढ

Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. भारतात सोन्याचे भाव सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. याशिवाय चांदीच्या भावातही विक्रमी वाढ झाली आहे. आता इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
Iran-Israel War
Iran-Israel WarSakal

Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. भारतात सोन्याचे भाव सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. याशिवाय चांदीच्या भावातही विक्रमी वाढ झाली आहे. आता इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्या-चांदीचे भाव आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मार्चमध्ये 10 टक्के वाढ झाल्यानंतर एप्रिलमध्येही सोन्याच्या भावत विक्रमी वाढ झाली आहे. आता इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये सोने आणि चांदीमध्ये इतकी वाढ झाली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये, म्हणजे सुमारे 9 दिवसांत, सोन्याचा भाव 70605 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 3765 रुपयांनी वाढून 74,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तसेच चांदीचे भावही झपाट्याने वाढले आहेत. सध्या चांदीचा भाव 85 हजार 500 रुपये किलोवर पोहोचला आहे.

Iran-Israel War
CDP-SURAKSHA: बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता अनुदानाची प्रक्रिया झाली सोपी

इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे सोन्याचे भाव का वाढतील?

सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत, युद्ध किंवा वाढत्या महागाईच्या काळात लोक जास्त धोका न पत्करता सोने-चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

आता इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढणार आहे, त्यामुळे त्याचा भावही वाढणार आहे. भारतात दागिन्यांची मागणी वाढणार आहे कारण लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या मागणीत मोठी खरेदी होणे शक्य आहे.

Iran-Israel War
IPL 2024: आयपीएलच्या जाहिरातीचं असं आहे 'गणित'; 10 सेकंदासाठी मोजावे लागतात तब्बल 12.5 लाख रुपये

2024 मध्ये किंमत कुठे जाईल?

केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी काही दिवसांपूर्वी अंदाज व्यक्त केला होता की, यावर्षी धनत्रयोदशीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा भाव 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.

मात्र, अद्याप एप्रिल महिना असला तरी पुढील काही दिवसांतच सोन्याने हा आकडा पार केला. या वर, मध्यपूर्वेतील एक नवीन जागतिक संकट देखील गुंतवणूकदारांसमोर आहे. अशा स्थितीत 2024 च्या अखेरीस सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचेल असा अंदाज आहे.

आर्थिक सल्लागार प्रवीण सिंग, यांच्या मते, ब्रिटन आणि जर्मनीकडून जाहीर होणारी आगामी आर्थिक आकडेवारी आणि चीनमधील व्यापार डेटा सोन्याच्या भावाला नवी दिशा देईल. मात्र, वेगाने बदलणाऱ्या जागतिक बाजारपेठेमुळे सध्या त्याचे भाव वाढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com