

Gold Price in Delhi, Mumbai, Pune and Other Cities
esakal
Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात सोन्याचे भाव घसरले आहेत. १७ ऑगस्टच्या सकाळी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,२७० रुपयांवर आला आहे. मुंबईत हा भाव १,५५,१२० रुपये इतका नोंदवला गेला. इतर प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात विविध शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या भावात ३,४९० रुपयांपर्यंत वाढ झाली होती, तर २२ कॅरेट सोने ३,२०० रुपयांपर्यंत महागले होते. जागतिक स्तरावर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे ०.९ टक्क्यांनी वाढ झाली होती.