Gold Rate Today: सोन्याचे भाव घसरले, तरी दसऱ्याच्या मूहर्तावर खरेदी कमी! कारण काय? 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Check 22K, 24K Gold and Silver Prices in Maharashtra: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरूनही जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत अपेक्षित गर्दी दिसली नाही. याच नेमकं कारण काय? आणि सध्या महाराष्ट्रात सोनं-चांदी नेमकं किती रुपयांना विकलं जातंय पाहा..
Gold Price Today

Gold Prices Fall, But Dussehra Buying Slows in Jalgaon — Check 10-Gram Rates

eSakal

Updated on: 

संजय महाजन

दसऱ्यानिमित्त दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत यंदा अपेक्षित तेजी दिसून आली नाही. दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील पिकांचे घटलेले उत्पादन आणि सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम बाजारपेठेवर झाला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साधारणतः 10 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा दरात घसरण होऊनही सामान्य ग्राहकांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवल्याने उलाढालीत सुमारे 15 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com