
Summary
भाऊबीजेदिवशी सोन्याच्या किंमतीत ₹3,726 प्रति 10 ग्रॅम इतकी मोठी घसरण झाली आहे.
चांदीतही ₹10,549 प्रति किलो इतकी घट झाली असून भाव ₹1,52,501 वर पोहोचला आहे.
MCX वर सोने 6% आणि चांदी 4% ने घसरली आहे.
भारतात सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढल्या आहेत.पण अलिकडच्या काळात दोन्ही धातूंच्या भावांत मोठी घसरण झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव ३,७२६ रुपयांनी घसरून १,२३,९०७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भाव १०,५४९ रुपयांनी घसरून १,५२,५०१ रुपये प्रति किटलो झाला. MCX वर सोने ६% घसरून १,२०,५७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदी ४% घसरून १,४४,००० रुपये प्रति किलो झाली. IBJA नुसार, २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव जाणून घेऊया.