
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी भारतात सोन्याच्या भावात बदल झाले आहेत. बुधवार, २ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा बाव ९८,५८३ रुपये आहेत तर २२ कॅरेट सोन्यासाठी दर ९०,३८३ रुपये आहे. प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात वाढ झाली असून एकूण किमतीत सुमारे १००० रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच, प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्यासाठी सोन्याच्या किमतीत १,०७० रुपये आणि २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम १,१६० रुपये वाढ झाली आहे.