
गुरुवारी सकाळी सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतीत वाढ दिसून येत आहे. स्पॉट मार्केटमध्ये वाढलेली मागणी आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सुरुवातीच्या व्यवहारात, सोन्याचा वायदा ०.०७ टक्क्यांनी किंवा ७१ रुपयांनी वाढून ९७,४६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करताना दिसला. पण जागतिक बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे.