Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

Gold Price in Mumbai, Pune: सोन्याच्या दरात सलग दहाव्या दिवशी घसरण झाली आहे. लग्नसराईपूर्वी झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, पाहा पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर.
Gold Rate Today

Gold jewellery and gold bars representing the recent fall in gold prices

eSakal

Updated on: 

Gold Price Today: सोनं-चांदीच्या बाजारात जानेवारी महिन्यात जी तेजी पाहायला मिळाली होती, त्याच प्रमाणात मोठी घसरण सध्या नोव्हेंबर महिन्यात दिसून येत आहे. आज सलग दहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली असून, सोनं तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. जानेवारीतील उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर तब्बल 50 हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे लग्नाचा सीझन सुरू होण्यापूर्वी सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...