

Gold Prices Surge Again! Gold Becomes Costlier by ₹50,000 in Just 6 Days
eSakal
Gold-Price Update Today: सध्याच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. कारण मागच्या 6 दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि इतर जागतिक घडामोडींचा यावर परिणाम होत आहे. मागच्या 6 दिवसांतच प्रति 100 ग्रॅम सोनं तब्बल 50,000 रुपयांनी महाग झालं आहे. त्यामुळे जे ग्राहक सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांनी एकदा ताजा भाव काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.