Gold Prices Fall After a Week, Silver Extends Decline for Second Day
Sakal
Gold Rate in Maharashtra : डिसेंबर महिन्यात रेपो दरातील कपातीनंतर देशभरात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ दिसून आली. दिवसेंदिवस सोन्यामध्ये होत असलेली गुंतवणूक आणि त्यामुळे वाढत जाणारे भाव सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. मात्र, २९ डिसेंबरच्या बाजारात सोन्याच्या भावात घसरण बघायला मिळाली.
Goodreturns च्या अहवालानुसार, आजच्या दिल्लीच्या सराफा बाजारात सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,४१,८६० रुपये इतका आहे जो काल १,४२,५७० रुपये इतका होता. तर २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याचा आजचा भाव १,३०,०५० रुपये इतका आहे.