

Gold Rate Today
Esakal
अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी महागले आहे आणि २२ कॅरेट सोने देखील १० रुपयांनी महागले आहे. दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम ६६० रुपयांनी वाढल्या आहेत आणि २२ कॅरेट सोन्याचे ६१० रुपयांनी वाढले आहेत. चांदीतही वाढ झाली आहे दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी एक किलो चांदी महागली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, दोन दिवसांत एक किलो चांदी ३१०० रुपयांनी वाढली आहे.