
Summary
एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ₹१,८६० व २२ कॅरेट सोन्यात ₹१,७०० ची घट झाली.
आज १७ ऑगस्ट २०२५ रोजी देशात २४ कॅरेट सोने ₹१,०१,१८० व २२ कॅरेट सोने ₹९२,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
सोन्याचे दर डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, जागतिक राजकीय-आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक मागणीवर अवलंबून ठरतात.
Gold Rate in India : आंतरराष्ट्रीय बाजारात टॅरिफबाबत अनिश्चितता असूनही, कच्च्या तेलाच्या किमती सतत घसरत असताना, एका आठवड्यात सोन्याचे भाव १८०० रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोने १,८६० रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही १,७०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. आज म्हणजेच १७ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात २४ कॅरेट सोन्याचा भाव सरासरी १,०१,१८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९२,७५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.