
२४ कॅरेट सोन्याचा दर आज १०८०३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून चांदीही १२४४१३ रुपये प्रति किलो झाली आहे.
सोने खरेदी करताना BIS लोगो, शुद्धतेचा दर्जा आणि HUID कोड असलेले हॉलमार्क दागिने तपासणे अनिवार्य आहे.
जागतिक बाजारातील चढउतार, डॉलरचा दर, आयात खर्च, महागाई आणि मागणी-पुरवठा यावर सोन्याच्या किंमती अवलंबून असतात.
Gold Price Today: सोने आणि चांदीच्या भावात सतत वाढत होत आहे. सोने आणि चांदीने पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १०८०३७ रुपये झाला, तर चांदीचा भाव १२४४१३ रुपये प्रति किलो झाला. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय आहेत हे जाणून घेऊया.