Gold Rate TodaySakal
Personal Finance
Gold Rate Today : गौरी-गणपतीमध्ये सोने खरेदीचा विचार करत आहात? जाणून घ्या आजचा ताजा भाव
Gold Rate Today : सोने आणि चांदीचे भाव अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांच्या आधारे दररोज ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात या धातूंचे भाव अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित केल्या जातात, त्यामुळे डॉलर-रुपया विनिमय दराचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो.
सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा बदल झाले आहेत. सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १००८८४ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलो ११५८७० रुपये झाला. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय आहेत हे जाणून घ्या.