

Latest gold and silver price updates showing revised 24K, 22K gold rates and rising silver prices in the bullion market.
esakal
Summary
२४ कॅरेट सोन्याचा भाव आज वाढून 10 ग्रॅमला १,२६,५५४ रुपय झाला.
दिल्लीमध्ये सोन्याचा दर ३००० ने वाढून १,३०,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
चांदीचा भाव देशात १,६२,७३० प्रति किलो आणि दिल्लीमध्ये १,६९,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सोने आणि चांदीच्या भावात काल घसरण झाल्यानंतर आज बदल झाले आहेत.इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२६,५५४ रुपये झाला. त्याच वेळी, चांदीचा भाव प्रति किलो १,६२,७३० रुपये झाला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्लीच्या बुलियन बाजारात सोन्याचा भाव ३,००० रुपयांनी वाढून १,३०,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भाव ७,७०० रुपयांनी वाढून १,६९,००० रुपये प्रति किलो सर्व करांसहित झाला.