Gold Rate Today
Sakal
सोन्याच्या भावात आठवड्याभरात मोठी वाढ झाली आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,०४० रुपयांनी वाढला आहे. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४५० रुपयांनी वाढला आहे. २८ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत सध्याच्या भाव प्रति १० ग्रॅम १४१,३७० रुपये आहे. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १४१,२२० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस ४,५३०.४२ डॉलर्सची झाली असून नवीन उच्चांक गाठला आहे. देशातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव जाणून घेऊया.