Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या
Silver Rate Today : सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ, देशांतर्गत बाजारात तेजी कायम.२६ डिसेंबर रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,३९,४१० प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे तर चांदीच्या भावातही वाढ झाली आहे.
देशात सोन्याच्या भावात सलग चार दिवस वाढ झाल्यानंतर आजही सोने तेजीत आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३९,४१० रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १३९,२६० रुपयांवर पोहोचला.