

Latest gold and silver price board showing updated rates across major Indian cities.
esakal
सोन्याच्या भावात चढ उतार सुरुच असतात. दरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. २४ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२५,९८० रुपयांवर आला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १२५,८३० रुपयांवर राहिला. देशभरातील इतर शहरांमध्येही किमती घसरल्या आहेत. पण एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७६० रुपयांची वाढ झाली आहे आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर, सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस $४,०६१.९१ आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया.