Gold Rate Today
आज सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,09,733 प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्ली सराफा बाजारात सोनं ₹1,300 ने आणि चांदी ₹1,670 ने स्वस्त झाली आहे.
सोन्यात गुंतवणुकीसाठी घसरणीचा काळ योग्य असून, भौतिक सोने व्यतिरिक्त गोल्ड ईटीएफ, एसजीबी आणि डिजिटल गोल्डसारखे पर्यायही उपलब्ध आहेत.
Gold And Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमती वाढतच राहतात, पण कधीकधी त्या घसरतातही. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०९,७३३ रुपये झाला, तर चांदीचाही भाव प्रति किलोग्रॅम १२५,७५६ रुपये झाली होती. दरम्यान, ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव सर्वोच्च पातळीवरून १,३०० रुपयांनी घसरून १,१३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम १,६७० रुपयांनी घसरून १,३१,२०० रुपये झाला. २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.