

Latest update on gold and silver prices across Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Bengaluru, and Hyderabad.
esakal
Summary
डॉलर मजबूत झाल्याने आणि फेडकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सोन्याचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले.
दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोने प्रत्येकी १० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
दोन दिवसांत २४ कॅरेट सोने ७२० रुपये व २२ कॅरेट सोने ६६० रुपयांनी घसरले आहे.
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव उतरले आहेत. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोने आणि चांदीची चमक आज सलग दुसऱ्या दिवशी कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २२ कॅरेट सोने देखील १० रुपयांनी स्वस्त झाले आहे.