
Gold Rate Today
Esakal
Summary
MCX वर सोन्याचा फ्युचर्स दर ₹१,२७,९९० प्रति १० ग्रॅम झाला.
तज्ञांच्या मते सोने येत्या महिन्यांत ₹१.५० लाखांच्या उच्चांकावर जाऊ शकते.
जागतिक मागणी, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि भू-राजकीय अस्थिरता ही वाढीची प्रमुख कारणे आहेत.
Gold Price Today: सोन्याच्या भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव काही प्रमाणात उतरले होते, मात्र आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या भावात बदल झाले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,६३३ रुपये होता.चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १,६३,०५० रुपये झाला.