Jefferies Predicts Gold Price May Double to $6600
esakal
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होते आहे. या किमती रोज नवनवीन विक्रम प्रस्तापित करत आहेत. भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १२ हजार ७४० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ३७६ रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अमेरिकेत सोन्याचे दर ३६०० डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सोन्याचे दर दुप्पटीने वाढू शकतात, अशा दावा अमेरिकन फर्म जेफरीजने केला आहे.