Gold and Silver Rate
Sakal
Gold rate In Maharashtra : २०२५ वर्ष संपत असताना ऐन नाताळात सोन्याच्या भावाने नवीन उच्चांक गाठला आहे. आजच्या दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव कालच्या तुलनेत ३२० रुपयांनी वाढला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे नवीन वर्ष सुरु होण्याआधीच सोन्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.