Gold Silver Rate
Sakal
Personal Finance
Gold Rate Today : सोन्याच्या दरात एका दिवसात मोठी घसरण, चांदीचे भावही झाले कमी; वाचा आजची किंमत
Gold Silver Rate Today सोन्याच्या दरात गेल्या २० दिवसात तब्बल ७ हजारांची घसरण झालीय. तर चांदीचे दरही कमी झाले आहेत. गेल्या महिन्यात सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता.
सोन्या चांदीच्या दरात गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली होती. पण त्यानंतर घसरण सुरू झालीय ती अजून सुरूच आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. एमसीएक्सवर १० ग्रॅम २४ कॅरेटच्या सोन्याचा वायदा बाजारातला दर ३ हजार ३५१ रुपयांनी घसरला होता. तर देशांतर्गत बाजारातही सोनं स्वस्त झालं. सोन्याच्या दरात उच्चांकापेक्षा तब्बल ८ हजारांनी घसरण झालीय.

