
आज सोन्याच्या भावात 500 रुपयांची वाढ झाली असून दर 1,00,800 रुपयांच्या वर पोहोचले आहेत.
चांदी मात्र घसरून 1,20,000 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे फेडची स्वायत्तता धोक्यात येईल या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे वळल्याचे तज्ज्ञांचे मत.
Gold Rate Today Tuesday 26 August 2025: आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोने प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांनी महागले असून देशातील बहुतेक शहरांत सोन्याचा भाव 1,00,800 रुपयांच्या वर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोने मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 93,600 रुपयांपेक्षा जास्त दराने व्यवहार करत आहे.
दरम्यान, चांदीच्या भावात मात्र घसरण दिसली. आज चांदी 1,20,000 रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत असून त्यात 1000 रुपयांची घसरण झाली आहे.