
Gold Rate Today
Sakal
Gold Rate Today: नवरात्रीत देशभरात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. 29 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहेत. भारतात सोन्याची मागणी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढते आणि पारंपरिकदृष्ट्या नवरात्रीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या वाढत्या मागणीसोबतच आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळेही सोन्या-चांदीच्या भावात वेगाने वाढ होत आहे.