
ओडिशामध्ये देओगड, सुंदरगड, नबरंगपूरसह अनेक जिल्ह्यांत सोन्याचे मोठे साठे आढळले आहेत.
अंदाजे 10–20 मेट्रिक टन सोनं सापडण्याची शक्यता असून सरकार पहिला गोल्ड माइनिंग ब्लॉक लिलावासाठी तयार करत आहे.
हा शोध राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि रोजगारासह खनिज विविधीकरणाला नवी दिशा देईल.
Gold Reserves: जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) च्या नुकत्याच झालेल्या खनिज सर्वेक्षणात ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची माहिती मिळाली आहे. खनिज मंत्री बिभूती भूषण जेना यांनी मार्च 2025 मध्ये विधानसभेत या शोधाची अधिकृत घोषणा केली.