
Gold Price Today
Sakal
नवरात्रीत सोन्याची मागणी वाढल्याने भाव पुन्हा विक्रमी पातळीवर पोहचले.
आज, 24 सप्टेंबरला देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,14,360 पर्यंत पोहोचला आहे.
यूएस फेडच्या व्याजदर कपातीच्या संकेतांमुळे तज्ज्ञांना पुढेही सोन्यात तेजी राहील अशी अपेक्षा आहे.
Gold Price Today: नवरात्र आणि सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असल्याने भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोन्याचा विचार होत असल्याने भावात सातत्याने वाढ होत आहे.