Gold Silver Price : अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोनं चक्क 600 रुपयांनी महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सुद्धा सोन्याच्या दरात 600 रुपयांची तेजी दिसून येत आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात उच्चांकी पाहायला मिळाली. सध्या अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजी अपेक्षित आहे. आज सुद्धा सोन्याच्या दरात 600 रुपयांची तेजी दिसून येत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,800 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 796 रूपये आहे. (Gold Silver Price update 15 April 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,500 रुपये

दिल्ली - 61,950 रुपये

हैदराबाद - 61,800 रुपये

कोलकत्ता - 61,800 रुपये

लखनऊ - 61,950 रुपये

मुंबई - 61,800 रुपये

नागपूर - 61,800 रुपये

पुणे - 61,800 रुपये

Gold Silver Price
Gold Silver Price : अक्षय्य तृतीयाच्या तोंडावर सोनं महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Silver Price
Gold Investment: जगात सर्वाधिक सोने कोण खरेदी करत आहे आणि का? जाणून घ्या

नवा नियम

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Price
Investment Tips : १९ व्या वर्षीच पोराला करोडपती बनवायचंय? मग आताच हे काम करा!

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com