
दिल्ली, मुंबई, पुणे आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोनं सुमारे 210 रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर चांदी 2000 रुपयांनी घसरली आहे.
MCX वायदा व्यवहारातही सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
टेरिफ तणाव, जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण यामुळे मौल्यवान धातूंमध्ये घसरण झाली आहे.
Gold Price Today: दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आज मात्र अचानक घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 210 रुपयांनी घसरून आता 99,970 रुपये झाली आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी कमी होऊन 91,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं आहे.