
2025 मधील अवघ्या 253 दिवसांत सोनं तब्बल 34,050 रुपयांनी महागलं असून, गुंतवणूकदारांना 43% परतावा दिला आहे.
10 सप्टेंबरला दिल्ली बाजारात सोन्याचा भाव विक्रमी 1,13,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
तज्ज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत हा दर 1.25 लाखापर्यंत जाऊ शकतो.
Gold Prices Hit All-Time Highs: 10 सप्टेंबरपर्यंत चालू वर्षाचे 253 दिवस आणि 6,072 तास संपले, आणि या काळात सोन्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. दिल्ली बाजारात सोन्याच्या भावात तब्बल 34,050 रुपयांची वाढ झाली असून, या वर्षी आतापर्यंत सोनं 43% पेक्षा जास्त महागलं आहे. मंगळवारी एकाच दिवसात सोन्याचा भाव 5,000 रुपयांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.