
Gold Price vs Stock Market: गुंतवणूकदार सोने आणि शेअर बाजाराची सतत तुलना करत असतात. पण यातील सर्वात चांगला गुंतवणूक पर्याय कोणता आहे याची चर्चा होत असते. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे याबद्दलचे विचार खूप वेगळे आहेत.
त्यांचा असा विश्वास आहे की "सोने फक्त भीतीच्या वेळी उपयुक्त आहे" आणि "ते काहीही करत नाही, फक्त तुमच्याकडे पाहते" म्हणजेच ते लाभांश देत नाही किंवा ते उत्पादक मालमत्ता नाही. परंतु आकडेवारी वेगळीच आहे. अलीकडील आकडेवारीच्या आधारे सोने आणि शेअर बाजारातील स्पर्धेत कोण पुढे होते ते पाहूया.