PF Interest: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व्याज दराबाबात मोठा निर्णय, काय आहे नवीन दर?

PF Interest News: केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जनरल पीएफ म्हणजेच GPF वर व्याजदर जाहीर केला आहे.
Government Keeps October-December General PF Interest Rate Unchanged at 7.1 percent
Government Keeps October-December General PF Interest Rate Unchanged at 7.1 percent Sakal

PF Interest News: केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जनरल पीएफ म्हणजेच GPF वर व्याजदर जाहीर केला आहे. या तिमाहीसाठी GPF वरील व्याज दर 7.1% वर कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू आहे.

GPF ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. सरकारी कर्मचारी त्याच्या पगाराचा काही भाग देऊन त्याचा सदस्य होऊ शकतो.

पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल नाही

सरकारने स्मॉल सेव्हिंग्ज-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF च्या व्याजदरातही कोणताही बदल केलेला नाही. अलीकडेच, सरकारने ऑक्टोबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांमध्ये फक्त पाच वर्षांच्या आवर्ती ठेव (RD) योजनेच्या व्याजदरात बदल केला होता.

त्याचा व्याजदर 6.5 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला आहे. पीपीएफसह इतर सर्व लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Government Keeps October-December General PF Interest Rate Unchanged at 7.1 percent
Forbes Billionaires List: फोर्ब्सच्या टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेतील 9 अब्जाधीश, पहिल्या क्रमांकावर कोण?

GPF काय आहे?

GPF ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF सारखी योजना आहे पण ती फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. वित्त मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग प्रत्येक तिमाहीत GPF आणि CPF, AISPF, SRPF, AFPPF सारख्या इतर निधीसाठी व्याजदर जाहीर करतो.

Government Keeps October-December General PF Interest Rate Unchanged at 7.1 percent
LPG Cylinder Subsidy: सर्वसामान्यांना मोदी सरकारची मोठी भेट, गॅस सिलिंडर झाला स्वस्त

आर्थिक व्यवहार विभागाची माहिती

या संदर्भात माहिती जारी करताना, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, सामान्य सार्वजनिक निधीच्या सदस्यांसाठी 2023-2024 या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी व्याजदर 7.1 वर ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर निधीसाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत 7.1 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com