
UPI Payment MDR: तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सरकार UPI द्वारे 3,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारण्याची योजना आखत आहे. बँका आणि पेमेंट सेवा कंपन्यांना तांत्रिक आणि ऑपरेशनल खर्चात मदत करण्याच्या उद्देशाने सरकार हे पाऊल उचलत आहे.