GST Collection: जून 2023 मध्ये विक्रमी जीएसटी संकलन, मोदी सरकारच्या तिजोरीत 1.61 लाख कोटींची भर

अर्थ मंत्रालयाने आज 1 जुलै रोजी जून 2023 महिन्याचा GST डेटा जाहीर केला.
GST Collection in June 2023
GST Collection in June 2023Sakal

GST Collection in June 2023: अर्थ मंत्रालयाने आज 1 जुलै रोजी जून 2023 महिन्याचा GST डेटा जाहीर केला. सरकारी आकडेवारीनुसार, सरकारला जून 2023 मध्ये जीएसटीमधून 1.61 लाख कोटी रुपये मिळाले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढले आहे.

मे महिन्यातील GST

यापूर्वी मे महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.57 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मे 2023 मध्ये सरकारी तिजोरीला मिळालेली ही कमाई एका वर्षापूर्वी म्हणजेच मे 2022 च्या तुलनेत 12 टक्के अधिक होती.

मे महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात जीएसटीने आतापर्यंतचा सर्वोत्तम विक्रम केला होता. एप्रिल महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपयांची कमाई झाली.

सरकारला जीएसटीमधून भरघोस कमाई होत असल्याचे आकडे दाखवतात. जीएसटीच्या 6 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत असे 6 प्रसंग आले आहेत, जेव्हा जीएसटीमधून महसूल 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.

त्याच वेळी, जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेला हा चौथा महिना आहे. इतकेच नाही तर गेल्या महिन्यात म्हणजे जून 2023 हा सलग 15 वा महिना होता जेव्हा सरकारला जीएसटीमधून 1.4 लाख कोटींहून अधिक महसूल गोळा करण्यात यश आले आहे.

GST Collection in June 2023
Mukesh Ambani: मुकेश अंबानी परदेशी बँकांकडून घेणार 1.5 बिलियन डॉलर कर्ज, काय आहे कारण?

अशा प्रकारे 1.61 लाख कोटी रुपये आले

जून महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) कडून 31,013 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) कडून 38,292 कोटी रुपये आणि इंटीग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) मधून 80,292 कोटी रुपये मिळाले आहेत.

GST Collection in June 2023
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com