
भारत सरकारच्या GST काउन्सिल बैठकीत कर रचना बदलण्याची शक्यता आहे.
चार स्लॅबऐवजी फक्त दोन स्लॅब (5% आणि 18%) ठेवण्याचा विचार सुरू आहे.
यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा, वस्तू स्वस्त होण्याची आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
GST Council Meeting 2025: भारत सरकारची गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे. या बैठकीत असा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्या देशात 5%, 12%, 18% आणि 28% असे चार जीएसटी स्लॅब आहेत. मात्र आता हे कमी करून फक्त दोन स्लॅब – 5% आणि 18% करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.